नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांची अनभुले हॉस्पिटलला सदिच्छा भेट

  • Home
  • Blog
  • नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांची अनभुले हॉस्पिटलला सदिच्छा भेट

नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांची अनभुले हॉस्पिटलला सदिच्छा भेट

ह्याभेटीदरम्यान त्यांनी अनभुले हॉस्पिटल व अनभुले मेडिकल फौंडेशन द्वारे होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली. त्याबद्दल कौतुक केलं तसेच हे उपक्रम भविष्यात मोठया प्रमाणावर कसे राबवता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन केले.

अनभुले हॉस्पिटल व अनभुले मेडिकल फौंडेशन द्वारा आयोजित केलेल्या शिबिरांमधून डोळ्याच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया नेत्रशल्यविषारद डॉ भूषण अनभुले  मोफत करतात.

तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत तिरळेपणा , डोळ्यावर येणारा पडदा त्यामुळे निर्माण होणारे दृष्टिदोष ह्यावरही मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात .

नेत्रविभागाला भेट देताना अद्यावत अशा  स्वतंत्र डोळ्याच्या ऑपरेशन थिएटर ची ही त्यांनी पाहणी केली. मोतीबिंदू साठी अद्यावतफेको टेक्नीकने तसेच विनाटक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया नियमित स्वरूपात अत्यल्प दरात होतात, प्रत्येक रुग्णाच्या निकडीनुसार लेन्स उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे रुग्णांना ऑपरेशन नंतर येणारी दृष्टी ही चांगली व समाधानकारक असते. तसेच जोडीला डॉ भूषण अनभुले ह्यांचा 15वर्षांचा प्रदीर्घ अनुभव ! महाराष्ट्र सरकारकडून त्यांना एक वर्षाच्या काळात सगळ्यात जास्त शस्त्रक्रिया केल्याबद्दल प्रशस्तीपत्र ही मिळाले आहे.

ना. कडू साहेबानी अनभुले हॉस्पिटल च्या जागतिक दर्जाच्या उपकरणांनी सुसज्ज अशा लॅपरोस्कोपी युनिट ची ही पाहणी केली . महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत गायनेक लॅपरोस्कोपीक सर्जन डॉ दीपाली अनभुले स्त्रियांच्या गर्भाशयासंबंधित सर्व शस्त्रक्रिया पुर्णतः मोफत करतात. ह्यामध्ये दुर्बिणीद्वारे वंध्यत्व निदान व निवारण,बंद गर्भनलिका मोकळ्या करणे,गर्भाशयतील पडदा/कोंब काढणे, बीजंडावरील सूज PCOD बीजंडाच्या गाठी,गर्भाशयाच्या गाठी fibroid , गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया,कमी वयात अंग बाहेर येत असल्यास गर्भपिशवी टांगण्याची sling शस्त्रक्रिया, गर्भपिशवी काढल्यावरही कालांतराने अंग बाहेर येणे ह्यासाठीच्या sling शस्त्रक्रिया , कुटुंबनियोजन पलटविण्याच्या शस्त्रक्रिया ह्या MPJAY अंतर्गत पुर्णतः मोफत करण्यात येतात.

इतरही दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्याकर्करोगा साठीच्या, अपेंडीक्स काढण्याची, हर्निया, पित्ताशयातील खडे , मूळव्याध ह्यावरही ह्या युनिट अंतर्गत अनभुले हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येतात.

ना बच्चू कडूसाहेबांनी ह्याबद्दल कौतुक व्यक्त करत भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर हे उपक्रम राबविण्यात यावे ह्याबद्दल मार्गदर्शन केले.

अनभुले हॉस्पिटल येथे अनभुले मेडिकल फौंडेशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व सहृदयतेने माननीय कडू साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आलेत.

ह्या कार्यक्रमामध्ये  श्री पोकळे साहेब, श्री पवार साहेब , हर्षल अनभुले ,निलेश जाधव , निखिल अनभुले , कल्पना जाधव , हे सर्व उपस्थित होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *